Posted by: rajdharma | 10/09/2010

भयकथा लेखकांना आवाहन

मित्रहो,

दिवाळी २०१० निमित्त एक विशेषांक काढण्याचा विचार करत आहे.  विषय आहे “भयकथा” ह्या अंकात फक्त भयकथा/रहस्यकथा/गुढकथा यांनाच स्थान देण्यात येईल.

याद्वारे मी लेखकांना आवाहन करीत आहे की त्यांनी आपले पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेले व स्वलिखित लिखाण संपादक मंडळास bhaykathadiwali@gmail.com या पत्त्यावर विरोपाने पाठवावे. सदर लिखाण १० ऑक्टोबर २०१० पर्यंत पाठवावे. त्यानंतर  आलेल्या लिखाणाचा गरज पडल्यास विचार केला जाईल.

१. लिखाण युनिकोड फॉन्ट वापरुन टेक्स्ट फाईल किंवा .doc फाइल या स्वरूपातच पाठवावे. प्रोप्रायटरी फॉन्ट वापरल्यास तो      फॉन्ट सोबत पाठवावा.

२. कथा पाठवितांना विषय : दिवाळी २०१० – भयकथा विशेषांक असे असावे.

३. कोणत्याही प्रकारचे लिखाण पाठवताना त्याची सॉफ्ट/हार्ड कॉपी स्वतःजवळ ठेवावी.

४. शक्यतो महाजालावर प्रकाशित रचना पाठवू नयेत. पाठविल्यास त्यासोबत त्या कोठे प्रकाशित झाल्या आहेत त्याचा संदर्भ द्यावा.

५. या दिवाळी अंकात प्रकाशित होणार्‍या कथा ह्या फक्त मनोरंजनाकरीता असून त्याचा उद्देश अंधश्रद्धेचा प्रसार करणे हा नाही.

६. कोणत्याही कथा प्रकाशित करणे / न करणे हा अधिकार संपादकांचा राहिल.

७. पाठवलेल्या लिखाणात संपादक मंडळ आवश्यकतेनुसार शुद्धलेखन तपासणी करण्याचा / ले आउट मधे बदल करण्याचा / आक्षेपार्ह
लिखाण गाळ्ण्याचा हक्क राखून ठेवत आहे.

८. आपण पाठविलेल्या लिखाणाची पोच विरोपाद्वारे देण्यात येईल. मात्र आपले लिखाण प्रकाशित करण्याची स्वीकृती देता येईलच असे
नाही.

९. दिवाळी अंकासाठी पुरेसे साहित्य न मिळाल्यास अंक प्रकाशित केला जाणार नाही. त्याची घोषणा याच ब्लॉगवर केली जाईल.

१०. आपण पाठविलेले लिखाण हे केवळ आपलेच आहे याची दक्षता घ्यावी. लिखाणाच्या ह्क्कावरुन भविष्यात उदभवणार्‍या वादाला /
कारवाईला लेखकालाच सामोरे जावे लागेल. संपादक कोणत्याही प्रकारे याला जबाबदार राहणार नाहीत.

११. आपल्या कथेबरोबर आपले संपूर्ण नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्र. कळवावा.

१२. व्यंगचित्रकारांनीदेखील विशेषांकाच्या विषयाला पुरक व्यंगचित्रे पाठवावीत.

१३. प्रकाशित कथांना / चित्रांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही.
हा पहिलाच प्रयत्न असल्याने काही चुका होतील त्या पदरात घेऊन वाचक / लेखक सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.


Responses

 1. कथा पाठवली आहे. अंकासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा!

 2. अरे वा! पुस्तकंही काढताय? लेखकांना मानधन द्यायचा विचार आहे की नाही? 😉 मी ’प्लॅन्चेट’ ही कथा अवश्य पाठवेन. आपल्याकडून ’मोगरा फुलला दीपावली अंक २०१०’ साठी साहित्य येऊ द्या.

 3. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे काय हो?

  • का हो ? सकाळी सकाळी हा प्रश्न का पडला बुवा ?

 4. हा अंक ऑनलाईन प्रकाशित होणार आहे की पुस्तकरूपी.

 5. अतिशय सुंदर उपक्रम! महाजालावर अशा प्रकारचे उपक्रम राबविल्याने लेखक व वाचक यांच्यातील परस्परसंबंध तर दृढ होतीलच, शिवाय सुप्त कलागुणांना वाव मिळायला असे उपक्रम म्हणजे पर्वणीच. आपल्या दिवाळी अंकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! योगायोगाने ’मोगरा फुलला’ तर्फेही या वर्षी दीपावली अंक प्रकाशित होणार आहे. तशी घोषणा उद्या दि. ११ सप्टेंबर रोजी मोगरा फुललावर केली जाईलच. अंकासाठी साहित्य पाठविण्याचे नियम व अटीही घोषित करण्यात येतील. आपल्याकडून ’मोगरा फुलला दिपावली अंक २०१० साठी’ दर्जेदार साहित्याची अपेक्षा आहे. अंकाचा दर्जा व योग्यता राखून ठेवण्यासाठी नियम व अटी तयार करणं हे केव्हाही चांगलंच. आपण नियमावलीमधे अतिशय योग्य मुद्दे विचारात घेतले आहेत, हे पाहून बरं वाटलं. अभिनंदन.

  माझी पूर्वप्रकाशित भयकथा ’प्लॅन्चेट’ या अंकासाठी पाठवायचा विचार आहे. कृपया शब्दमर्यादा कळली तर पाठवावी की नाही, हे नक्की करता येईल

  • कांचनताई,
   आपल्यासारख्या जेष्ठ ब्लॉगर्सची प्रतिक्रिया मिळणे हे मी माझे भाग्यच समजतो. आपण आपली कथा जरुर पाठवा. शब्दमर्यादेची अट नाही. हा अंक ऑनलाईन प्रकाशित होणार आहे. पुस्तकासाठि जाहिरातदार शोधणे चालू आहे. जर बजेट जमले तर नक्कीच. तसा काही बदल झाल्यास ब्लॉगवर जाहिर केले जाईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: