Posted by: rajdharma | 07/09/2010

चीनी उत्पादकांचा खोडसाळपणा

चीनचा भारतद्वेष प्रत्येक बाबतीत दिसून येतो. मी नुकतेच चीनमध्ये निर्मित TPLink चा वायरलेस राऊटर घेतला. सर्व सेटिंग्स केल्यानंतर राऊटर वर भारतीय प्रमाण वेळ टाकावी म्हणून “टाईम सेटिंग” चा टॅब बघीतला आणि धक्काच बसला. देशांच्या प्रमाणवेळेच्या यादीत कोठेही भारताचे नाव नाही. इंटरनेटवरुन तुमच्या देशाची प्रमाणवेळ बघण्यासाठी एक टॅब आहे तेथे जाऊन टिचकी मारल्यानंतरही तेथे इस्लामाबाद, कराची अशी प्रमाणवेळ दिसते. मी यासंदर्भात डीलरकडे विचारणा केली असता त्याने फर्मवेअर अपग्रेड केल्यावर हवा तो बदल होईल असे सुचविले. त्याप्रमाणे बदल करुन बघीतला मात्र काहीही फरक पडला नाही. त्यानंतर मी त्यांच्या टेक्नीकल सपोर्ट टीम ला मेल टाकून असे का ? विचारले मात्र काहीही उत्तर आले नाही.

खरोखरच हा भारतद्वेष असावा की तांत्रिक चूक ? मला तर ही तांत्रिक चूक असणे केवळ अशक्य वाटते. खाजगी कंपनी जर असे वागू शकते तर सरकारी पातळीवर काय होत असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी !

तुम्हाला काय वाटते ?


Responses

 1. सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघून खूपच दुख: झाल, खरे कारण न जनता, कुठलाही विचार न करता, स्वतःला प्रश्न न विचारता दिल्या गेलेल्या ह्या प्रतिक्रिया आहेत. एखाद्या गोष्टीचा निगेटिव विचार केला कि सगळाच चूक दिसत. मला वाटत कि आपण डोळे उघडे ठेवून प्रश्न विचारला आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला कि समजेल कि हे प्रकरण इतके वाईट नाही….
  राऊटर टाईम सेटिंगचे खरे कारण:
  राऊटरची SDRAM खूपच मर्यादित असते, टाईम सेटिंग हे ह्या SDRAM मध्ये लिहिले जाते, भारताची प्रमाणवेळ हि +०५:३० आहे, सोप्या भाषेत सांगायचे तर त्यासाठी ६ जागा लागतात. (+. ०, ५, :, ३. ०). मर्यादित जागेमुळे हे राऊटर निर्माते फक्त मुख्य नंबर वापरतात (१,२,३,…१२) म्हणजे ज्या प्रमाणवेळा ५:३०, ६:३० इत्यादी आहेत त्या दाखवल्या जाणार नाहीत. फक्त +/- १, २, ३, ….१२ प्रमाणवेळा त्या राऊटरमध्ये असतील.

  • आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. उलटसुलट प्रतिक्रिया येणारच त्यात वाईट वाटून घेण्यासाऱखे काहीच नाही. ह्याच विषयावरची ही चर्चा पहा !

   मी त्यांना पाठविलेल्या मेलमधे “(Get GMT when connected to Internet)” ही सुविधा चालत नाही त्याबद्दल तक्रार केली होती. त्यावरही काही उत्तर आले नाही. हा ही एक मुद्दा आहे.

   • वाईट ह्यासाठी वाटल कि सगळ्या प्रतिक्रिया नकारात्मक होत्या आणि कुणीही खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत न्हवते. कुठल्याही समस्येला प्रश्न न विचारण्याची वृत्ती मला बोचत आहे, कुठल्याही समस्येच्या गाभार्यात न जाण्याची वृत्ती मला बोचत आहे.

 2. your writing gives realistic picture and is worth reading. I would like to respond to you in Marathi but do not know how to do it on your blog.

  • तुम्ही “गमभन” हे मोफत “add on” आयई किंवा फायरफॉक्स वर इन्स्टॉल करुन मराठी, हिंदी आणि इतर बर्‍याच भाषांमधे लिहू शकता.

 3. Ase honarach, apalyamadhe deshbhakti nahi. Sarvajan paishyachya mage ahot.

  Apan desh vikayala suddha kami karnar nahi.

  Fakta shandha sarakhe gappa basu.

  Enjoy!!!

 4. he tumhala aamhala kalatay pan bharat sarkar la kadhi kalnar ??

 5. आजची युद्धे ही रणांगणावर खेळली जात नाही तर व्यापारी क्षेत्रा मध्ये खेळली जातात. यामुळे कधी नकाशात भारताचा नकाशा चू दाखवतात. तर मिथ्या प्रमाणात उत्पादन करून शत्रू राष्ट्रात कवडीमोल भावने माल विकला जातो ,राज्य करते डोळस असले तर हा धोका ओळखून लगेच अश्या मालावर बंदी घालतात . भारतीय राजकारण्यावर न बोललेलेच बरे.

 6. same thing with many of china-made mobiles…
  most of them have world clock but do not IST zone!,.. they have karachi and Dhaka but not Delhi or Kolkata!!

 7. हा निश्चित पणे भारत द्वेष आहे. कारण बाकी देशांची प्रमाण वेळ आहे आणि भारता ची नाही हे काही पटत नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: