आवाज चे संपादक श्री. सुहास पाटकर यांचे २ ऑक्टोबर २०१० रोजी निधन झाले.
“आवाज” ने माझी प्रत्येक दिवाळी फटाके न फोडता ही धुमधडाक्यात साजरा करण्यात मोलाचा हातभार लावला आहे. “आवाज” ची खिडकी चित्रे संकल्पना तर इतकी यशस्वी झाली की नंतर केवळ तीच संकल्पना उचलून इतर किती तरी दिवाळी अंक निघू लागले.
श्री. भाऊ पाटकर (श्री. सुहास पाटकर यांचे वडील) यांच्या पश्चात श्री. सुहास पाटकर यांनी “आवाज” ची धुरा आठ वर्षे समर्थपणे सांभाळली होती.
यंदा आवाज चे हिरक महोत्सवी वर्ष आहे. अंकाची जवळपास सर्वच तयारी पूर्ण करुन सुहास यांनी या जगाचा निरोप घेतला. दिवाळीत सुहास पाटकरांचा अंक मला हसवेल आणि त्यांची आठवण उदास करेल हे नक्की ! तसेच मनातल्या मनात यावर्षीच्या तसेच पुढील वर्षीच्या अंकाची तुलना होईल हे ही नक्की !
श्री. सुहास पाटकरांच्या कुटुंबियांना त्यांचा विरह सहन करण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना !
वाचक काय म्हणतायेत !